अर्थ समजून घेणे ही एक प्रथा आहे. अर्थ लावणे मात्र जरा जपूनच करावे लागते. नाही म्हणजे तसा "अर्थ लावणे" हा शब्दप्रयोग सुद्धा कधी कधी वर्जित आहे. पण समजून घेणे कधी कधी जमत नाही. पटत नाही. कधी समजून घ्यावेसेच वाटत नाही. मग अर्थ महित करुन घ्यायचा प्रयत्न...
'स्वस्तिक'. एका बिन्दुतुन निघालेले चार काट्कोन. 'स्व' पासून आरम्भ होणारे विशेष-नाम. पण, 'स्व' म्हणजे स्वस्तिकाचा केन्द्रबिन्दु का?
आणि त्यापासून सुरु होणार्या चार दिशा. काही काट्कोनात तर काही... विरूद्ध. दिशा कोणतीही असू दे, एकदा दिशा पकडली तर तीच चालणे भाग. परत जरी यावेसे वाटले तरी येतो परत 'स्व' कडेच.
आणि प्रत्येक दिशेला एक वळण. तेही काट्कोनात. वळण घेऊन पुढे जाणे वा परत 'स्व' कडे येणे हेच दोन पर्याय. वळण घेतले तरी काय... मार्ग तोच.
आणि 'अस्तिक'. ईश्वरामध्ये विश्वास ठेवणारा. ईश्वरामध्ये विश्वास ठेवून चारातल्या एका दिशेला पाउल टाकणारा. अपूर्ण-पूर्ण च्या भोउतिक व्याख्या ओलान्डून अविरत श्रद्धा जोपासणारा. ज्या दिशेला पाउल टाकेल, तिकडे ईश्वर शोधणारा.
किती मर्यादित वाट्ते 'स्व' ची व्याख्या. फक्त मी, बाकि कहिच नाही. 'अस्तिक' मात्र जगद्व्व्यापी ईश्वरा प्रमाणेच नाना सन्ज्ञा असणारा नाना दिशेला आपला प्रकाश घेऊन जाणारा.
'स्व' जेव्हा मोठा होतो, तेव्हा 'अस्तिक' ही आपले तेज विसरतो. मग दिशा कोणतीही असू दे, 'स्व' फक्त स्वार्थ पाहतो. स्वार्थ शोधतो. आणि 'अस्तिक' त्याचा गुलाम बनतो. श्रद्धा कर्म्कान्ड होते. धर्माभिमान, परधर्मद्वेश बनतो. 'स्वस्तिक' घेऊन बेताल नाझीवाद पसरतो.
'दिशा चारच, पण टोकेरी. असत्य हेच सामर्थ्य बनू पहात असलेल्या जगात, भुमिका ही बद्लताहेत. एक दिशा धरून चालणे नफा-तोट्याच्या समीकरणात बसत नाही. मग स्वस्तिका'चे रूप कोण जोपासणार...
'स्व' पासूनच सुरुवात. अहम एवढा प्रचन्ड कि सर्व काहि 'स्व' पासूनच सुरु व्हावे आणि 'स्व' लाच येऊन मिळावे. पण अन्त 'स्व' मध्येच, अन्त फक्त 'स्व' चाच. 'अस्तिक' अमरच असतो ...
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
JUST DEADLY............
Post a Comment